April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

नकोडा येथे श्री.संत रविदास महाराज जयंती उत्साह २०२० साजरा

 नुकतेच मौजा नकोडा येथे श्री.संत रविदास नव युवक महिला मंडळ नकोडा यांचा सौजन्याने श्री.संत रविदास महाराज जयंती उत्साह २०२० साजरा करण्यात आला. १४ व्या शतकातील चर्मकार समाजातील महान बहुजन समाज क्रांतीकार तथा सामाजिक समतेचे उद्धाते जगन गुरु संत शिरोमणी श्री.संत रविदास महाराज यांची ६४३ वी जयंती ०९ फेब्रुवारी २०२० रोजी चर्मकार समाजबांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. आयोजित कार्यक्रम जि.प सदस्य श्री.ब्रिजभूषन पाझारे यांचा अध्यक्षतेखाली पार पडला.

चर्मकार समाजाच्या वतीने दरवर्षी संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नकोडा गावातून भजनासह जनजागृती रैली काढण्यात आली. संत रविदास महाराजाच्या जयजयकार नकोडा गावात पाहायला मिळाला. आयोजित कार्यक्रमाला सौ.तनुश्री बांदुरकर सरपंच, श्री.संभाजी वाघमारे, श्री.अरविंद जगणे, सुमन ठमके, माधव देशमाने, कांचनताई वाकडे, सौ.लीलाताई नवले, प्रवीण काकडे, बाबाजी आपटे, शंकर वाघमारे, सौ.शीला ढाक, सौ.पल्लवी लांडगे, सौ.लता नवले, सौ. कविता दुबे, सौ.

भारती दुबे, शोभाताई लीपटे, सौ.रत्नमाला उपाध्ये, सौ.गंगाताई देशमाने, सुरेखा वाघमारे, सौ. शोभा इंगळे, विजय ढाक, नरेंद्र लांडगे, भगवान धुळे व श्री.संत रविदास महाराज मंडळ नकोडा चे आयोजन समिती तसेच गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!