
चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळ व गजबजलेलं ठिकाण म्हणजे बस स्टॅन्ड चा परिसर. या परिसरात न्यायालयाच्या समोर एका मनोरुग्ण महिलेच्या हातात चक्क वर्तमानपत्र बघून काहींना धक्काच बसला.काही वेळासाठी नागरिकांना वाटले कि, खरच हि महिला मनोरुग्ण आहे? मात्र तेथे असलेल्या काही पत्रकारांनी तिच्या जवळ जाऊन बघितले असता ती खरोखरच मनोरुग्ण आहे याची खात्री पटली.मात्र तिच्या हातात वर्तमानपत्र होते.आणि ती वाचत होती.कोणत्याही प्रकारच्या मानसिक आजाराने पिडीत रुग्णास मनोरुग्ण असे म्हणतात.मनोरुग्णाकडे दुर्लक्ष करत त्यांना कायमचे मनोरुग्णालयाच्या चौकटीत बंद करणाऱ्या कुटुंबियांची अनेक उदाहरणे आपल्याला दिसत असतात. मात्र चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळ व गजबजलेल्या बस स्टॅन्ड व न्यायालयाच्या समोर एका मनोरुग्ण महिलेच्या हातात चक्क वर्तमानपत्र दिसले.आणि ती वाचत होती.
More Stories
राम नगर पुलिसांनी अवैध दारूविक्री ची ‘ऑल आऊट मोहीम सुरू
महिला ‘पीएसआय’वर लग्नाचे आमिष दाखवून सहकारी एपीआयचा बलात्कार; डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व पुढील तपास पोलिस करीत आहे
अवैध रेती वाहतूकदारावर कारवाई